निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे..
रावेर :- कृषी तंत्रज्ञान विद्यालय निंभोरा बु.ता.रावेर येथे ३०.जुलै. रविवार रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची रावेर तालुका स्थरीय बैठक रावेर तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . या बैठकीत नविन सदस्य क्रियाशील वाढविण्यावर विचार विनिमय करण्यात आला. तसेच पत्रकारांचा विमा,अधिस्वीकृत पत्रकारांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच रावेर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी निवड उपस्थित पञकार सदस्यातुन करण्यात आली. उपाध्यक्ष पदी नियुक्ती प्रभाकर महाजन, तसेच सचिव ईकबाल पिंजारी,संघटक विजय एस.अवसरमल, सल्लागार प्रकाश हिराजी पाटील, सहसल्लागार विजय के.अवसरमल, यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पञकार संघटनेचे ग्रामीण विभाग जिल्हाध्यक्ष संतोष नवले, ग्रामीण कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी,(शिवा भाई) रावेर तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे, तालुका कार्याध्यक्ष रविंद्र महाजन, तसेच जेष्ठ पञकार राजीव बोरसे, आनंदा रामा भालेराव,दिपक रमेश श्रावगे, कैलास भाऊलाल लवंगडे, महेंद्र पाटील,शरद तायडे, तसेच पञकार सदस्य उपस्थित होते.
सर्वानुमते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.रावेर तालुक्यातील पत्रकार मंडळी मोठया संख्येने सहभागी होते.सूत्रसंचालन इकबाल पिंजारी,आभार योगेश सैतवाल यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.