एरंडोल: – खडके बुद्रुक (ता.एरंडोल) येथील अनाथ बालकांच्या बालगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात काल (ता.३) रात्री एका अल्पवयीन पिडीत मुलीने तक्रार दिल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, शिक्षक,बालकल्याण समितीचे अध्यक्ष व बालकल्याण समितीचे सदस्य अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बालगृहातील अनाथ मुलगा व
पिडीत मुलींनी लैंगिक अत्याचाराची तिसरी तक्रार दाखल केल्यामुळे यातील आरोपींची संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान बालगृहातील अत्याचार
प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे काढून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
खडके बुद्रुक येथील कै.यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अनाथ मुलांचे व मुलींचे बालगृहातील अल्पवयीन मुली व एका मुलाने बालगृहाचा काळजीवाहक पदावर असलेल्या गणेश शिवाजी पंडित याने लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलींनी दिलेल्या तक्रारीनंतर काळजीवाहक गणेश पंडित,त्याची पत्नी तथा बालगृहाची अधीक्षिका अरुणा पंडित यांचेसह संस्थेच्या सचिवाविरोधात गुन्हा दाखल होऊन गणेश पंडित व अरुणा पंडित यांना पोलिसांनी अटक केली आहे तर संस्थेचे सचिव फरार झाले आहेत.
काल रात्री उशिरा पुन्हा एका पिडीत अल्पवायीने मुलीने दिलेल्या जबाबावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत बालकल्याण समितीचे अध्यक्ष,सदस्य, संस्थेचे अध्यक्ष व एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.काल एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबात बालगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली.अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ दादाजी पाटील,काळजीवाहक गणेश पंडित,शिक्षक प्रताप पाटील,
बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार, सदस्या विद्या रवींद्र बोरनारे,सदस्य संदीप निंबाजी पाटील यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बालगृहातील अल्पवयीन मुळे व मुली यांच्यावर झालेल्या अत्याचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांवर ठेवण्यात आला आहे.खडके येथील
बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरण मागील आठवड्यात उघडकीस आल्यानंतरव चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,
अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांचेसह त्यांच्या मुलांकडे पिडीत अल्पवयीन मुली व मुलाने तक्रार केल्यानंतर देखील त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करून संशयितास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केली जात आहे.अल्पवयीन मुलींच्या लैंगिकशोषण अत्याचार प्रकरणामुळे संतप्त झालेल्या विविध संघटनांनी निषेध मोर्चे काढून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.