अमळनेर:- खराब रस्त्यामुळे अमळनेर बोहरा बस चिखलावरून घसरून रस्त्याच्या खाली उतरून कलंडण्याच्या स्थितीत असतांना सुदैवाने निंबाच्या झाडाला टेकली गेल्याने बस उलटता उलटता वाचली व चालक वाहकासह प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
बोहरा गावाजवळ मुख्य रस्त्यावर ही घटना घडली असून बोहरा रस्ता अतिशय चिखलमय झालेला असून त्यामुळे या रस्त्यावरून पाऊस पडल्यास बस बंद होते.
मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांच्या विनंतीवरून बस सुरू करण्यात आलेली होती. मात्र पावसामुळे रस्ता अतिशय चिखलमय झालेला आहे. मंगळवार संध्याकाळची बस बोहरा गावी जात असताना चिखल मातीमुळे बस घसरून रस्त्याच्या खाली खोलगट चारीत उतरली मात्र कडेला लिंबाचे झाड असल्याने झाडाला टेकली गेली. त्यामुळे बस उलटण्याचा अनर्थ टळला.
शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी पूर्ण बस भरलेली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत प्रवासी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रस्त्यावर माती पसरवल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. या भागात काळ्या मातीचे प्रमाणही जास्त आहे व पाऊस पडून गेल्याने या रस्त्यावरुन जाणारी वाहने रस्त्याच्या एका बाजुकडून दुसऱ्या बाजूला आपोआप सरकतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असून त्यामुळे रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






