महिला घरी एकटीच असताना पुतण्या मित्रासोबत घरी गेला. ती काही कारणाने बेडरुममध्ये गेली असता तो तिच्या मागोमाग खोलीत गेला आणि म्हणाला, काकू तू,….
चेन्नई : २१ वर्षीय पुतण्याने आपल्या ४८ वर्षीय काकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. तामिळनाडूमधील कोडुंगैयुर येथील राहत्या घरात भिंतीवर डोकं आपटून तरुणाने महिलेचा जीव घेतला. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर ऑगस्टिन अरुण आणि त्याचा मित्र सोलोमन (२२) या दोघांनी खून केल्याचा आरोप आहे.
खुनाच्या आरोपाखाली दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे. पोलिसांना सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता, परंतु सोलोमनच्या चौकशीत सत्य समोर आले.पोलिसांनी सांगितले की, संबंधित महिला घरी एकटीच होती. त्यावेळी तिच्या दिराचा मुलगा ऑगस्टिन आणि त्याचा मित्र दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरी आले.
महिलेचा पती आणि त्यांची दोन मुलं घरी नव्हती. बोलत असतानाच महिला काही कारणास्तव आपल्या बेडरूममध्ये गेली. हीच संधी साधून पुतण्या ऑगस्टिनने तिच्या पाठी गेला आणि त्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली.संतप्त झालेली काकू त्याच्यावर ओरडली. वठणीवर आला नाही, तर त्याच्या आई-वडिलांना आणि इतर नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगण्याचीही तिने धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या ऑगस्टिनने आधी तिला कानशिलात लगावली. नंतर आपल्या हातांनी तिला मारहाण केली. अखेर भिंतीवर तिचे डोके आपटून दोघंही जण पळून गेले.
जेव्हा महिलेचा मुलगा कामावरून घरी परतला तेव्हा त्याला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजच्या सहाय्याने ऑगस्टिन आणि सोलोमन घरात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना पकडले.ऑगस्टिनने सुरुवातीला आपल्यावरील आरोप नाकारले. काकूने उधार घेतलेले पैसे परत आणण्यासाठी आपण गेलो होतो, त्या कारणास्तव आधीही आपण त्यांच्या घरी गेलो होतो, असा कांगावा केला. मात्र पोलिसांनी सोलोमनची चौकशी केल्यावर खरे कारण समोर आले.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा