जामनेर(प्रतिनिधी) :- सोशल मिडिया माध्यमातून वापरले जाणारे इन्स्टाग्राम या अँपवर भारतीय संविधान व आंबेडकरी समुदाया विषयी आक्षेपार्ह आणि अश्लील असे शब्द वापरून पोस्ट केलेल्या तरूणा विरोधात अँट्रासिटी व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार जामनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्यातील वाकी खु येथील आकाश गणेश तेली व प्रकाश गादेकर (पत्ता माहिती नाही) यांनी सोशल मिडीया माध्यमाच्या इन्स्टाग्राम अँपवर भारतीय संविधान व आंबेडकरी समुदायाच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह व अश्लील शब्दांत पोस्ट व्हायरल केल्या.
त्यावरून दि.५ ऑगस्ट २०२३ रोजी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सचिन अनिल सुरवाडे (वचिंत बहुजन आघाडी जामनेर तालुकाध्यक्ष) यांच्या फिर्यादी वरून आरोपी आकाश गणेश तेली (वाकी खु.व प्रकाश गादेकर (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही)या दोघां विरोधात भारतीय दंड संहिता १८६० (कलम २९४) व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम,१९८९ च्या ३(१)(s) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून.आरोपी आकाश तेली यास अटक करण्यात आली आहे.
भारतीय संविधान व आंबेडकरी समुदाया विषयी पूर्वग्रह दुषीत मनात चिड असल्याने या आधीही काही महिन्यापूर्वी आकाश तेली याने सोशल मिडियावर महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती.त्यावेळी पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांनी व समाजातील कार्यकर्ते यांनी त्याला समज दिली होती.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






