पाळधी l प्रतिनिधी
पाळधी तालुका धरणगाव येथिल प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुप यांचे कार्यालयातील कॅबिेन मधील २ लाख ६० हजाराची रक्कम रात्री चोरट्यांनी घेवून पोबारा केला. या घटनेने येथे एकच खळबळ उडाली आहे.
येथिल प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुप चे संचालक अशोक व शरद कासट यांचे महामार्गावर घर असून घराच्या आवारात त्यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. तेथूनच त्यांचे सर्व व्यवहार होत असतात.ते विट भट्टीच्या व्यवसाय बरोबरच सरकारी कंत्राटदार आहेत.त्यांच्या कार्यालयात जवळपास सहा कॅबिेन आहेत.
रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कार्यालयातील खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व त्यांनी प्रत्येक कॅबिेन मध्ये जावून ड्रॉवर मधून पैसे काढले यात शरद कासट यांचे ४०हजार,शैलेश कासट यांचे १लाख,आशिष कासट यांचे ७०हजार,अमर कासट ५०हजार असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केला. या वेळी तेथे असलेल्या रखवालदार याला चाहूल लागली या वेळी चोरट्यांनी त्याला दगड मारून फेकले त्याने आरडा ओरड करताच घरातील सर्व जण जागे झाले मात्र चोरट्यांनी पळ काढला.
या वेळी त्यांनी सोबत सी सी टी व्हि चा डीव्हीआर सोबत नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल झाले त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही.घटनास्थळी फिंगरप्रिंट पथक दाखल होऊन त्यांनी ठसे घेतले.अमळनेर भागाचे डी वाय एस पी सुनील नंदवालकर, धरणगावचे पो. नि.उध्दव ढमाले, स.पो. नि.प्रमोद कठोरे आदींनी भेट दिली. या बाबत अनिल कासट यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पुढील तपास उमेश भालेराव आदि करीत आहेत.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.