जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
विवाह बोलणी लांबणीवर पडू शकतात. परिचयातील व्यक्तीचे हित ओळखावे. अनोळखी व्यक्ती मदत करतील. मेहनतीला पर्याय नाही. विरोधक नामोहरम होतील.
वृषभ :-
विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भागीदारीच्या व्यवसायाकडे लक्ष ठेवावे. अति उत्साहाने कामे बिघडू शकतात. मित्रांच्या भेटीने शुभ वार्ता मिळतील. उगाच तर्क-वितर्क करत बसू नका.
मिथुन :-
आंधळा विश्वास ठेऊ नका. नेमक्या मुद्यांवर लक्ष ठेवा. आर्थिक अडचण फार जाणवणार नाही. कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या. गोडी-गुलाबीचे धोरण ठेवावे.
कर्क :-
आहारावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. घरगुती गोष्टीत तिखट प्रतिक्रिया देऊ नका. मन विचलीत होऊ शकते. जुनी कामे आधी हातावेगळी करावीत.
सिंह :-
चर्चेतून मार्ग काढावा. गुंत्यातून बाहेर पडाल. हातातील कामात यश येईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.
कन्या :-
भडक मार्गाचा अवलंब करू नका. मनाची चंचलता आवरावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
तूळ :-
काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. कौशल्याने कामे कराल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. समस्यांचे निराकरण होईल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
वृश्चिक :-
जुने गैरसमज दूर होतील. अवाजवी खर्च टाळावा. दिवस प्रसन्नतेत जाईल. कामातील सुलभतेकडे अधिक लक्ष ठेवाल. पित्त विकारात वाढ होऊ शकते.
धनू :-
उपासनेत मन रमवावे. शांतता हवीशी वाटेल. वाहन विषयक समस्या मिटतील. मुलांचे वागणे नाराजीचे भासू शकते. सकारात्मक दृष्टीकोनात वाढ होईल.
मकर :-
घरातील वातावरण शांत ठेवावे. यांत्रिक कामात लक्ष घालाल. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावेत. नियोजित कामे पार पडतील. वैचारिक स्थैर्य जपावे.
कुंभ :-
वादाचे मुद्दे टाळावेत. दिवस आळसात घालवू नका. देण्या-घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील. जवळच्या मित्रांशी वाद घालू नका. चैनीत दिवस घालवाल.
मीन :-
आरोग्यात सुधारणा होईल. आततायीपणे वागून चालणार नाही. खर्च नियोजनात ठेवावा. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. आर्थिक गोष्टीवरून वाद टाळावा.
हेही वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……