एवढेच नाही तर यूट्यूब आणि रिल्ससाठी अश्लील व्हिडीओ ही बनविला.
गोरखपूर (उत्तर प्रदेश):- सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. गोरखपूरमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानकातून रिक्षाने घरी जाणाऱ्या महिलेचे पाच तरुणांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.एवढेच नाही तर बेशुद्ध होईपर्यंत तिचे लचके तोडले. एवढेच नाही तर यूट्यूब आणि रिल्ससाठी अश्लील व्हिडीओही चित्रित केले.
मिळालेली माहितीनुसार, पीडित महिला संत कबीरनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बुधवारी रात्री ती बस्तीहून ट्रेनने गोरखपूरला पोहोचली. पहाटे तीन वाजता ती रेल्वे स्थानकावरून रिक्षाने नौसादला जात होती. त्याचदरम्यान नराधमांनी तिचे अपहरण केले.
राजघाट पुलाजवळ पाच तरुणांनी रिक्षा थांबवून महिलेचे अपहरण केले आणि जबरदस्तीने तिला दुचाकीवर बसवून पेरूच्या बागेत नेले. नराधमांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर महिला बेशुद्ध झाल्याचे पाहुन तिला त्याच अवस्थेत सोडून तरुणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली. यावेळी आरोपींनी पोलीस पथकावर गोळीबारही केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मुख्य आरोपी प्रद्युम्न जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी प्रद्युम्नसह अन्य 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ बनवला असून पीडितेसोबत अश्लील सेल्फीही घेतल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……