सावद्यात ११० फूट तिरंगा ध्वज उभारणीचे काम सुरू, स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकेल.

Spread the love

सावदा l प्रतिनिधी (प्रशांत सरवदे)

शहरातील बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून सुमारे २३ लाख खर्चून ११० फूट उंच तिरंगा ध्वज उभारणीचे काम सुरू झाले आहे. सोमवार दि. ०७ ऑगस्ट २०२३ पासून या कामास सुरवात झाली.

यावेळी शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख सुरज (बद्री) परदेशी, मनीष भंगाळे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता व्ही. के. तायडे, ज्यु इंजिनिअर हेमंत महाजन, फिरोज खान पठाण, शाम अकोले, बौद्ध युवा ट्रस्टचे वेडु लोखंडे, नाना संन्यास, वाघराज तायडे, प्रदीप करोशिया आदी उपस्थित होते. १५ ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होऊन येथे तिरंगा फडकेल, असे नियोजन आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार