चाळीसगाव l प्रतिनिधी :- माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.८/८/२०२३ रोजी ‘जागतिक आदिवासी दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मेहुणबारे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले.
सर्व प्रथम मान्यवरांचे हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन केले. त्यानंतर कृष्णा पुरीया टोकरीया या विद्यार्थ्याने ‘आदिवासी गित’ सादर केले. सदर शिबीरात श्री.वैभव चौधरी, मुख्याध्यापक, अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मेहुणबारे, ता. चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. श्री.सुनिल मोरे, शिक्षक अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मेहुणबारे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. अॅड.श्री.लव हरीभाऊ राठोड, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी ‘जागतिक आदिवासी दिवस’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्री.प्रविण पाटील, पोलीस नाईक, मेहुणबारे पोलीस स्टेशन यांनी ‘रस्ता वाहतूक नियम’ या विषयावर मार्गदर्शन केले. श्री.सचिनकुमार भुपेंद्र दायमा, पी.एल.व्ही. तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी ‘रॅगींग विरोधी कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘जागतिक आदिवासी दिवस’, ‘रस्ता वाहतुक नियम’, ‘रॅगींग विरोधी कायदा’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सदर शिबीरात शाळेतील सर्व आदिवासी विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार,वरिष्ठ लिपीक व श्री.तुषार अनिल भावसार, शिपाई यांनी पाहिले. श्री.राहुल चौधरी, कार्यकारी व्यवस्थापक अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मेहुणबारे, ता.चाळीसगाव यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……