निंभोरा प्रतिनिधी:- परमानंद शेलोडे
रावेर :- मागील काही दिवसांपासुन पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई – बहिणी वरून केलेली शिवीगाळ ही एका लोकप्रतिनिधीला निश्चितच शोभणारी नव्हती. एवढ्यावर न थांबता आमदारांनी स्वतः केलेल्या शिवीगाळचे समर्थन देखील केले. या वादाचा कळस म्हणून काल दुपारी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ बघितल्याने समाजमन सुन्न झाले आहे. संदीप महाजन हे पाचोरा शहरात पत्रकारिता करतात.
त्यांच्या परिवारासह पाचोरा शहरात राहतात. बुधवारी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असताना महानगरपालिकेसमोर अज्ञात गुंडांनी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकत दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली. आमच्या किशोर आप्पाच्या नादी यापुढे लागलास तर याद राख अशी धमकी त्यांना गुंडांनी दिली. या घटनेनंतर घाबरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.या घटनेचा तीव्र निषेध निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील 29 गावाचे पत्रकार बंधूनी केला.
निंभोरा पोलीस स्टेशन चे सहायक पो.निरीक्षक गणेश जी धुमाळ व पीएसआय रा.का.पाटील यांच्याजवळ निवेदन देण्यात आले.निवेदना प्रसंगी रावेर पत्रकार समितीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीप जी महाराज पंजाबी , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रावेर तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे, जेस्ट पत्रकार राजू बोरसे, सुनील कोंडे, अनिल आसेकर ,प्रवीण धुंदले, कांतीलाल गाढे, भीमराव कोचुरे, विजय काशिनाथ अवसरमल, संकेत पाटील, सादिक पिंजारी, युसुफ खाटीक, विनायक जहुरे, विजय अवसरमल, जमील शेख, प्रभाकर महाजन, संजय पाटील, सद्दाम पिंजारी, राजेंद्र महाले, विनोद कोळी, शेख इद्रिस, दिलीप सोनवणे ,दस्तगीर खाटीक हे या निवेदना प्रसंगी उपस्थित होते.
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……