पारोळा :- सद्या जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे.भडगाव तालुक्यातील घटनेला एक आठवडा झाला नाही लगेच पारोळा तालुक्यात ही घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील एका तरुणांने लैंगिक अत्याचार करून मुलीच्या डोक्यावर दगड मारून व दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पीडित मुलीला धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला बलात्कार, जीवे ठार मारण्यांचा प्रयत्न, विनयभंग, व दगडाने ठेचून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेप्रकरणी आरोपीस फाशी द्यावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले, त्यानंतर सदर समाज बांधवानी महामार्गवर काही वेळ रास्तारोको केले. या संदर्भात पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली, त्या आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता.
तसेच पीडितेच्या भावाने तक्रार दिली असून आरोपीला अटक झाली आहे पुढील तपास पारोळा पोलिस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील शिवसेना तालुका प्रमुख मधुकर पाटील यांनी त्या गावास भेट देवून घटनेची माहिती घेतली व पोलीस प्रशासनास सूचना केल्या.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम