एरंडोलला नूतन पदाधिका-यांना नियुक्तीपत्र वाटप व सदस्य नोंदणी शुभारंभ.
एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या सर्व पदाधिका-यांनी एकत्रित येवून पक्षसंघटन मजबूत करावे असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त पदाधिका-यांना आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
तसेच सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी पक्षाचे सर्वसामान्य, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते हीच खरी पक्षाची ताकद असल्याचे सांगितले.आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहून पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन केले.मतदार संघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरु असून कार्यकर्त्यांनी झालेल्या कामांची माहिती मतदारांना द्यावी असे आवाहन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळून तालुका पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध होईल असा विशास व्यक्त केला.पदाधिका-यांनी घराघरात जाऊन सदस्य नोंदणी करावी असे आवाहन केले.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करावी असे आवाहन केले.जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांचेसह उपस्थित प्रमुख पदाधिका-यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.यावेळी पक्षाच्या विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी कासोद्याचे माजी सरपंच सुदाम राक्षे यांचेसह विविध पदाधिका-यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
तसेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.बैठकीश माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,संघटक संभाजी पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,बाजार समितीचे संचालक किरण पाटील,माजी उपसभापती अनिल महाजन, माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, पन्नालाल सोनवणे,के.जी.पाटील,माजी सभापती गबाजी पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख कृष्णा ओतारी,संघटक मयूर महाजन यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
गणेश पाठक यांच्या परिवारास आर्थिक मदत.
फरकांडे येथील शाखाप्रमुख गणेश पाठक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.गणेश पाठक हे परिवारातील कर्ते पुरुष होते.गणेश पाठक यांच्या निधनामुळे त्यांच्या परीवारासमोर आर्थिक समस्या निर्माण झाली होती. आमदार चिमणराव पाटील स्वत: वैयक्तिक गणेश पाठक यांच्या वारसास ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करून पाठक यांच्या परिवाराला दिलासा दिला.