जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आत्मविश्वास वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल. शेअर्स मधून लाभ संभवतो.
वृषभ :-
नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. तरुणांनी आळशीपणा करू नये. कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे. सामाजिक भान ठेवणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.
मिथुन :-
महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत. मनाची उदासीनता दूर सारावी. जोखीम घेताना सावध रहा. योग्य तर्क बांधावा लागेल. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे.
कर्क :-
घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मुलांचा खोडकरपणा वाढेल. रेस जुगाराची आवड जोपासाल.
सिंह :-
मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा. तरुणांना करियर विषयाची चिंता सतावेल. बौद्धिक ताण घेऊ नका. कामात तत्परता दाखवावी. बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल.
कन्या :-
जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाला वाटा फुटू शकतात. मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक ठेवाव्यात.
तूळ :-
कौटुंबिक गोष्टींचा प्राधान्याने विचार करा. तरुण वर्गाचे मत जाणून घ्या. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. दृष्टीकोनात बदल करून पहा. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.
वृश्चिक :-
आपल्या मनाप्रमाणे वागणे ठेवाल. हेतु समजून प्रतिक्रिया द्यावी. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. हाताखालील लोकांवर फार अवलंबून राहू नका.
धनू :-
जोडीदाराचे सौख्य वाढेल. गरजेनुसार काही बदल करून पहा. मनातील नसती चिंता बाजूस सारा. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. जुनी कामे सामोरी येतील.
मकर :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. स्थावर व्यवहारातून लाभ होईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.
कुंभ :-
मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतील. वैवाहिक जीवनात आनंद वाटेल. सहकारी अपेक्षित मदत करतील. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका.
मीन :-
तोंडात साखर ठेवून बोलावे. आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका. काटकसरीवर भर द्यावा. जवळचे मित्र भेटतील. आहारावर नियंत्रण ठेवा.
हेही वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……