पारोळा : – शहराचा सर्वांगीण विकासासाठी आमदार चिमणराव पाटील हे सदैव प्रयत्नशील असतातच. त्यातच आता छोट्या-छोट्या समाजांना न्याय द्यावा, त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, शहरातील अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमिंमध्ये अत्यावश्यक सुविधा तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या, शहरात विद्युत रोषणाई व्हावी एकप्रकारे इतर शहरांप्रमाणे पारोळा शहराचा देखील कायापालट व्हावा ही दूरदृष्टी आमदार चिमणराव पाटील यांची आहे. त्याच अनुषंगाने शहरात कोट्यावधींची कामे देखील आज प्रगती पथावर आहेत.
शहराचा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी.. यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. शहरात सुरु असलेल्या पाईपलाईनचे काम देखील आज पावेतो ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यातच आता नव्याने ५ कोटीच्या विकासकामांची भर पडली आहे. यात आमदार चिमणराव पाटील यांच्या दूरदृष्टीने शहरातील छोट्या समाजांना न्याय देण्याची भूमिका आमदार चिमणराव पाटील यांनी घेतील आहे. यात प्रामुख्याने शहरातील धरणगांव रोड लगत असलेल्या जागेत धोबी समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणेसाठी ३५ लक्ष, पारोळा शहरातील महादू आप्पा नगर भागात असलेल्या जागेत नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणेसाठी ३५ लक्ष,
पारोळा शहरातील सोमेश्वर महादेव चौकाचे सुशोभीकरण करणेसाठी ५० लक्ष, पारोळा शहरातील गोसावी समाजाच्या दफनभूमीला सुशोभीकरण करणेसाठी ३५ लक्ष, पारोळा शहरातील धुळे रोड लगत असलेल्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासह इतर विकासाभिमुख कामे करण्यासाठी १ कोटी, पारोळा शहरातील श्रीभवानीगड परिसरात सभागृहाच्या बांधकामासाठी २० लक्ष, पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ लागून असलेल्या भगवान नथ्थू नगर भागातील खुल्या जागेच्या सुशोभीकरणासाठी २५ लक्ष, पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ला लागून असलेल्या अमळनेर चौफुली परिसर सुशोभीकरण करणेसाठी ५० लक्ष व पारोळा शहरातील विविध भागांत विद्युतीकरण करणेसाठी १.५० कोटी या कामांचा समावेश आहे.
या मंजूर कामांत धोबी, नाभिक व गोसावी समाजाला पूर्णपणे न्याय मिळाला असून आमच्या सारख्या छोट्या समाजांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांचे या समाजांतर्फे आभार व्यक्त केले जात आहेत. तसेच या विकासकामांना लवकरच सुरुवात करणार असून शहरातील प्रत्येक घटकाला असाच न्याय देणार असून शहराच्या विकासात कुठलीही बाब अपूर्ण पडू देणार नसल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले