महिला दिनानिमित्त सावित्रीच्या लेकींचा होणार सन्मान, महिलांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

Spread the love

झुंजार ।अमळनेर (प्रतिनिधी)

अमळनेर :- ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका गायत्री दीपक पाटील व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दीपक पाटील यांनी फक्त प्रभागातीलच नव्हे तर शहरातील शैक्षणिक,उद्योग,आरोग्य, समाजकारण,क्रीडा,नाट्य,नोकरी या विविध क्षेत्रातील तसेच सेवानिवृत्त व कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला जाणार आहे.

यावेळी प्रभाग क्रमांक 7मधील वामन नगर येथील विकासकामांचे लोकार्पण मान्यवर महिलांच्या हस्ते होणार आहे.८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ढेकू रोड भागातील वामन नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील,मा.नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,प्रांताधिकारी तथा पालिका प्रशासक सीमा अहिरे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,माजी प्राचार्या ज्योती राणे हे उपस्थित राहणार आहेत.

टीम झुंजार