जळगांव:- स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे झेंडावंदन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता.. कोरोनाच्या महाभयंकर लाटेदरम्यान पेशंटचे जवळचे नातलगसुध्दा पेशंट जवळ येत नव्हते तेव्हा कोविड-19कंत्राटी कर्मचा-यांनी आपल्या जिवाची बाजी लावून जनताजनार्दनाची तथा शासनाची सेवा केली आहे.
या कोविड कर्मचा-यांनी पहिली व दुसरी तिव्र लाट आटोक्यात आणताच गरज सरो अन वैद्य मरो असे करुन कामावरुन काढुन टाकले व बेरोजगार केलेआहे.यामुळे या कोरोना योध्द्यांवर ऊपासमारीची वेळआली आहे.त्यासाठी शासनाने सहानुभूतीने विशेष बाब म्हणुन अर्हतेनुसार शासनसेवेत सामाऊन घ्यावे यासाठी सनदशिर मार्गाने लढा सुरु आहे.
त्याचाच एक भाग म्हणुन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपीई किट घालून बेरोजगार कोविड-19कंत्राटी कर्मचा-यांनी ना.गुलाबराव पाटील यांचे लक्ष्य वेधावे म्हणून शांततेत अनोखे आंदोलन केले.यावेळी अमोल चौधरी,सतीष सोनवणे,सिमा गावंडे,प्राजंल पाटील,मधुकर शिरसाळे,मनोज पाटील,कुवंरसिंग पावरा,महेंद्र न्हावी आदि कोविड कर्मचारी शासनसेवेत सामाऊन घेणेची मागणी करीत होते.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४