जळगाव :- मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब व कार्याध्यक्ष शिवश्री प्रा.अर्जुनराव तनपुरे साहेब दिनांक19.08.2023 रोजी कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त शनिवारी जळगांव दौऱ्यावर येत आहेत यासाठी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसह समविचारी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब व शिवश्री अर्जुनराव तनपुरे साहेब जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्याचबरोबर पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार बाबत हा दौरा असून शनिवार दिनांक 19.08.2023 संध्याकाळी 6 ते 8वा मराठासेवा संघ कार्यालय निवृत्ती नगर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश ऊपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील,विभागिय कार्याध्यक्ष शिवश्री रामदादा पवार,मा.विभागिय अध्यक्ष सुरेश पाटील,जिल्हाध्यक्ष शिवश्री अनिल पाटील, महानगराध्यक्ष शिवश्री हिरामण चव्हाण यांनी केले आहे
” जय जिजाऊ जय शिवराय”
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






