मुखेड : मुलीने प्रेमसंबंध ठेवल्याने अल्पवयीन मुलीची वडिलांनी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या बापास बेड्या ठोकल्या आहेत. आण्णाराव राठोड असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.शामका आण्णाराव राठोड (वय १६) असे खून करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. दरम्यान, मुलीने फाशी घेतली असल्याचा बनाव आरोपी बापाने केला होता. पोलीस तपासात या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, मयत शामका राठोड हिचे चुलत आत्याच्या मुलाशी प्रेम संबंध होते. त्याच्याशीच विवाह करणार असा तिचा आग्रह होता. मात्र, मुलगा हा व्यसनाधारी असल्यामुळे मुलीच्या वडिलांस ते मान्य नव्हते. वारंवार मुलीस वडिलांनी समजावून सांगितले. पण, प्रेमाचे भूत हे काही निघत नव्हते. त्यामुळे आरोपी अण्णाराव राठोड याने मुलीस वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने बापाने पोटच्या मुलीचा राहत्या घरातच तोंड दाबून खून केला.
मुलीने मानसिक दबावातून फाशी घेतली आहे, असा बनाव करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लगेच आरोपी बापाने मुलीचा अंत्यसंस्कार केला होता. त्यामुळे संशयाची पाल कुठे तरी चुकचुक करीत असल्याने ही घटना मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे इन्व्हिस्टीगेशन टीम सह पोलिसांचा ताफाचं ताफा घटनास्थळी तपासाकरिता दाखला झाला. तपासासाठी राख व हाडाचे नमुने घेण्यात आले होते. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापास ताब्यात घेतले आहे. मयत शामका राठोड हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






