गोंडगाव येथील चिमुकलीला जलदगतीने न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना सकल मराठा पाटील समाजाचे निवेदन.

Spread the love

जळगाव :- गोंडगांव ता भडगांव येथील चिमुकली कु कल्याणी संजय पाटील हिच्यावर अमाणुस कृत्य करुन निर्घुण खुन करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सकल मराठा पाटील समाज न्याय समितीच्या शिष्टमंडळाने आज तसे निवेदन प्रत्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेऊन दिले असता मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी

गोंडगांव ता भडगांव येथील पिडीत बालिकेची केस जलदगती न्यायालयात चालविण्यास, व ऍड. उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात येईल असे सांगुन गृहमंत्रींनी स्वतः फोन वर ऍड. उज्ज्वल निकम साहेब यांच्याशी बोलून त्यांच्यावर या केसचे कामकाज करण्याचे सांगितले, व उज्ज्वल निकम साहेब यांनी देखील क्षणाचाही विचार न करता केस चालवण्यासाठी होकार दिला

जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी या शिष्टमंडळास सोबत घेऊन मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घालून सविस्तर माहिती दिली या दोन्ही नेत्यांच्या मध्यस्थी मुळे आमच्या शिष्टमंडळास खुपच सहकार्य लाभले त्यांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत.

या शिष्टमंडळा सकल मराठा पाटील समाजाचे खालील बांधव उपस्थित होते
१) श्री सोमनाथ रघुनाथ मराठे पाटील सुरत, मुख्य संयोजक मराठा पाटील समाज न्याय समिती
२) श्री चिंतामण बाजीराव पाटील, पाचोरा ,सह संयोजक मराठा पाटील समाज न्याय समिती
३) श्री भानुदास भागवत पाटील
४) श्री दिलीप हिलाल मराठे
५) श्री मोतीलाल भिला नरवाडे
६). भरत अभिमन मराठे
७). विठ्ठल नामदेव मराठे
८) भगवान दादा तलवारे
९) अमृत गयभू मराठे
१०) सुनील रघुनाथ मराठे
११) गणेश नंथ्थू चव्हाण
१२) सुनील राजाराम पाटील
१३) मुकेश अशोक पाटील
१४) विलास राजाराम पाटील
१५) गणेश काशीनाथ पाटील
१६) डॉ.ई.के.पाटील सुरत
१७) अरुण दिनकर पाटील
१८) सुनील अर्जून मराठे
१९) चंद्रकांत वसंत पाटील
ह्या उपस्थित सर्व समाज बांधवांचे पिडीत बालिकेच्या कुटुंबाच्या वतीने आभार मानतो
श्री चिंतामण बाजीराव पाटील संचालक पाचोरा

हे पण वाचा

टीम झुंजार