एरंडोल येथे महाकवी वामनदादा कर्डक जयंती संपन्न

Spread the love

एरंडोल :- येथील श्रावस्ती पार्क येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रसंगी भन्ते, नागसेन व संघरक्षित भंते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे राष्ट्रीय सचिव प्रा. भरत शिरसाठ यांनी व श्रावस्ती पार्क वासीयांनी केले होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी बनते नागसेन बनते यांनी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले. तसेच उपस्थित उपासक उपासिका यांना त्रिसरण व पंचशील दिले. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते शालिग्राम दादा गायकवाड यांनी भंतेना सेन व भन्ते संघरक्षित यांचे स्वागत केले. आयोजक भरत शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून वामनदादा कर्डक यांच्या जीवना बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रम प्रसंगी भंते नागसेन व शालिग्राम दादा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मनोज नन्नवरे सर, प्राध्यापक गाढे सर, वर्षा शिरसाठ यांनी वामनदादांचे लिखित गीत सादर केले. कार्यक्रम प्रसंगी भंते नागसेन यांनी प्राध्यापक भरत शिरसाठ यांच्या संकल्पनेतून एरंडोल येथे होत असलेल्या भव्य बुद्धीस्ट स्टडी सेंटर बद्दल समाधान व्यक्त केले. भन्ते नागसेन यांनी आयोजित केलेल्या धम्म सहलीतील धरणगाव, अमळनेर व जळगाव जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील बौद्ध उपासक- उपासिका सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर धम्म सहलीतील उपासक- उपासिकांचे एरंडोल येथील बौद्ध मंडळांमार्फत स्वागत करण्यात आले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार