सावखेडासिम ग्रामपंचायतीत झालेल्या अपहार संदर्भात यावल पंचायत समिती समोरील उपोषण आठव्या दिवशी मागे

Spread the love

यावलच्या इतिहासात प्रथमच सव्वापांच तास रास्ता रोको आंदोलन,ग्रामसेवकाची विभागीय चौकशी तर गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस.

यावल : तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतीत झालेल्या अपहार संदर्भात यावल पंचायत समिती समोरील उपोषण आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. दरम्यान उपोषण कर्त्यांच्या सर्मथनार्थ महाविकास आघाडी कडून तब्बल पावणे पाच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले व जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शहरात आल्यावर त्यांनी स्पेशल ऑडीस सह ग्रामसेविकाची विभागीय चौकशीचे आदेश दिल्या नंतर उपोषण व आंदोलन मागे घेण्यात आले.

यावलच्या इतिहासात प्रथमचं इतकावेळ रस्ता आडवण्यात आला यात भुसावळ,फैजपूर व चोपडा रस्त्यावर तीन्ही बाजुने पाच किमी पेक्षा जास्त अंतरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तसेच शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले
यावल पंचायत समिती समोर पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक १४ ऑगस्ट पासुन आमरण उपोषण सुरू होते. या दरम्यान गुरूवारी (दि.१७)उपोषण कर्त्यांना समर्थन देत कॉग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.

तसेच नंतर शुक्रवारी (दि.१८) रोजी महाविकास आघाडी कडून भुसावळ टि-पॉइंट वर रास्तारोको आंदोलन करण्यात आले तसेच उपोषण कर्त्यांची दखल घेत जिल्हा परिषदेकडून गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली तर शनीवारी (दि.१९) रोजी आमदार शिरिष चौधरी, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांची भेट घेवुन उपोषण कर्त्यांच्या संर्दभात माहिती दिली. मात्र, जो पर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तो पर्यंत उपोषण कायम राहिल असा पावित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला व सोमवारी पुन्हा महाविकास आघाडी सह निळे निशान सामाजिक संघटनेच्या सहभागाने

अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर भुसावळ टि-पॉइंटवर रास्तारोको आंदोलनला सकाळी ११.४५ पासुन सुरवात करण्यात आली व जो पर्यंत जिल्हा परिषदेचे अधिकारी येत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्णय आंदोलकांनी घेतला व जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील हे शहरात ३.३० वाजेला दाखल झाले व त्यांनी उपोषण कर्त्यांना ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणी स्पेशल ऑडीट करण्यात येईल व यात अपहार सिध्द झाल्यावर संबधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच ग्रामसेवकाची विभागीय चौकशी प्रस्ताविक करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले व सकाळी ११.४५ पासुन सुरू झालेले रास्तारोको आंदोलन सायंकाळी ४.२५ वाजेला मागे घेण्यात आले

या आंदोलनात जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा माजी प्राचार्य प्रा.जी.पी.पाटील, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, कॉग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, सेना उबाठा तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, पप्पु जोशी, संतोष खर्चे, डॉ. विवेक अडकमोल, राष्ट्रवादीचे एम.बी. तडवी, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, राष्ट्रवादीचे प्रविण पाटील, सुकदेव बोदडे, कामराज घारू, आबीद कच्छी, राजेश पाटील, हाजी गफ्फार शाह, विक्की गजरे, सुनिल भालेराव, इम्रान पहेलवान, शेख नईम, राजेश करांडे, उमेश जावळे, विक्की पाटील, पवन पाटील, शरद पाटील, उस्मान तडवी, अमर कोळी, राजु महाजन, अलताफ तडवी, निळे निशान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे, लक्ष्मीताई मेढे, विलास तायडे, बापु जासुद सह मोठया संख्येत पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला यांनी रास्तारोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या

आमदारांच्या हस्ते उपोषण घेतले मागे.
पंचायत समितीच्या आवारात शेखर पाटील सह रहेमान रमजान तडवी व सलीम मुसा तडवी या तीघं उपोषण कर्त्यांशी आमदार शिरिष चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड, एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्याशी चर्चा करून लेखी आश्वासाना नंतर उपोषण मागे घेण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार