भुसावळ :- बाजारपेठ पोलिसांनी गुटख्याची होणारी तस्करी रोखत सुमारे ५६ लाख ९२ हजार ४८० रूपयांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई रविवारी २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता केली.विशेष म्हणजे कंटनेरमध्ये सुरूवातील लहान मुलांचे चॉकलेट व जेम्सचे खोके रचून त्याआड गुटख्याची तस्करी केली जात होत होती. याप्रकरणी सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ११ मिनीटांनी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनर चालकाला अटक करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कंटेनर (क्रमांक यु.पी.78 सी.एन.5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी लावली. रविवारी २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता नाहाटा चौफुलीजवळ कंटेनर आल्यानंतर ट्रकची झडती घेतली असता त्यास चॉकलेट बॉक्सच्या आड राजनिवास मानमसाल्याची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंटेनर भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयात लावण्यात आला.
अन्न व सुरक्षा विभागाला पत्र दिल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी न आल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोकॉ प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक जगदीश मांगिलाल श्रीवास्तव (वय-४८) रा. इंदौर, मध्यप्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी ५६ लाख ९२ हजार ४८० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






