मुंबई :- विक्रोळी परिसरात शिक्षकी पेशालाच काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका पालिकेच्या शाळेत चार मुलींवर पी टी शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.शिक्षा देण्याच्या नावाखाली हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करीत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे.
विक्रोळी पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला आता अटक केलेली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना उघड होताच नागरिक आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि शिंदे गट आमने-सामने….
विक्रोळी पूर्वेतील एका मनपा शाळेतील 4 विद्यार्थिनींवर पीटी शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी पीटी शिक्षकाला अटक केली असून, या घटनेमुळे विक्रोळी पोलीस स्टेशनसमोर सर्वच राजकीय पक्षांनी धाव घेतली. या घटनेचा जाहीर निषेध करत शिक्षकावर कडक कारवाईची मागणी देखील करण्यात आली. शिंदे गटाचे पदाधिकारी हे या घटने संदर्भात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये आले होते. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष चेतन अहिरे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे सरकारचा जाहीर निषेध करण्यास सुरुवात केली. यामुळे विक्रोळी पोलिस स्टेशनसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा