Viral Video:एक जोडपे रस्त्याने जात असतांना, एक तरूण विवाहितेस छेडतो पुढे काय झालं पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video : आपल्या वाईट कृत्याचे फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे वाईट काम करायचे नाही असं प्रत्येकाला लहानपणापासून सांगण्यात येते. तर वाईट काम केल्यानंतरही आपल्याला त्याचे वाईट फळ मिळणार असं अनेकांच्या मनात असतं.त्यामुळे वाईट कामापासून दूर राहायला पाहिजे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूण एका भुयारी मार्गावर थांबलेले दिसत आहेत. तर तिथूनच एक जोडपे जात असताना त्या दोन तरूणातील एक तरूण तरूणीची छेड काढताना दिसत आहे.

पाठीमागून तरूणीच्या अंगावर काहीतरी वस्तू फेकल्यानंतर तिच्यासोबतत असलेल्या तरूणाला राग येतो आणि तो या तरूणांकडे येऊन चांगलाच धडा शिकवतो. दोन दोन फटक्यामध्ये ते दोघेही खाली पडतात आणि त्यातील एक तर थेट बेशुद्ध पडतो.
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून छेड काढणाऱ्या तरूणांना आपल्या कृत्याचं फळ मिळाल्याचं यातून आपल्याला दिसेल. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार