झुंजार । एरंडोल(प्रतिनिधी)
एरंडोल :- 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एरंडोल येथे महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. आजची स्त्री ही पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. घरातील स्त्रीचे आरोग्य चांगले राहिले तर ती घरातील सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते आणि म्हणूनच या स्पर्धेत शंभराहून अधिक महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी महिलांचे दोन गट करण्यात आले होते, 20 ते 40 वयोगट व 40 च्या पुढील वयोगट.. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून एरंडोल शहराच्या तहसीलदार मा. सुचिता चव्हाण मॅडम व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सुविद्य पत्नी सौ. मीनल जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. पद्मालय रस्त्याला पाच किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा ठेवण्यात आली होती.सकाळी पावसाची रिमझिम सुरु असतांना देखील मॅरेथॉन पार पडली..कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही..विशेष म्हणजे तरुणींसोबत वयस्कर महिलांचाही मोठा उत्साह होता,मदतीसाठी कृष्णा ओतारी आणी मित्रपरिवार यांनी मोलाचे सहकार्य केले..
20 ते 40 वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक नगरसेविका सौ.छाया आनंद दाभाडे ,द्वितीय क्रमांक डॉक्टर जुमाना इब्राहिम बोहरी तर तृतीय क्रमांक सौ.कविता अमोल सोनार यांचा आला. 40 च्या पुढील वयोगटात प्रथम क्रमांक सौ.उर्मिला संजय पाटील द्वितीय क्रमांक सौ.माधुरी अशोक भवर व तृतीय क्रमांक सौ.शिल्पा काबरा यांचा आला.. महिलांना ठिकठिकाणी रस्त्यात रेणुका मंडळातर्फे पाण्याचे वाटप, राजस्थानी महिला मंडळातर्फे ग्लुकोजचे वाटप होत होते. भगवती ज्वेलर्स व श्री डायग्नोस्टीक सेंटर यांच्यातर्फे सर्व महिलांना कॅप देण्यात आल्यात. नगरसेविका जयश्री पाटील यांच्यातर्फे कॉफी, माजी नगरसेविका शकुंतला अहिरराव यांच्यातर्फे बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
बालाजी ऑइल मिल यांच्यातर्फे महिलांना स्पर्धा झाल्यावर आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती ..दोन्ही गटातून प्रथम तीन क्रमांक आलेल्या महिलांना डॉ.उज्वला राठी व क्षमा साळी यांच्यातर्फे रोख बक्षीस, सर्टिफिकेट व अंजुषा विसपुते यांच्या कडुन ट्रॉफी चे वाटप 12 तारखेला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात करण्यात येणार आहे.. सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात येईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजस्थानी महिला मंडळ, शारदोपासक महिला मंडळ, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, साळी समाज महिला मंडळ, जिजाऊ महिला मंडळ, मानसी महिला मंडळ, आस्था महिला मंडळ, सर्वधर्म समभाव महिला मंडळ, रेणुकामाता महिला मंडळ, गुजर महिला मंडळ व जागृती महिला मंडळांचे सहकार्य लाभले. मॅरेथॉन स्पर्धेची मूळ संकल्पना व तिच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने डॉ. उज्वला राठी,शोभा साळी, शकुंतला अहिरराव,रश्मी दंडवते, क्षमा साळी,अंजुषा विसपुते,स्वाती काबरा,संध्या महाजन, आरती ठाकुर यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.