यावल l प्रतिनिधी :- तालुक्यातील कोरपावली गावात अनेक दिवसापासुन आपली दुकानचालवणाऱ्या एका बोगस डॉक्टराकडुन चुकीच्या उपचारा पध्दतीमुळे एक महिलेचा दुदैवी मृत्यु झाल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे . या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , कोरपावली तालुका यावल या गावात गेल्या तिन ते चार वर्षापासुन विद्युत विश्वास राय नामक एका बंगाली कथित डॉक्टरांने आपला दवाखाना उघडला होता ,या बोगस डॉक्टराच्या विरुद्ध यावल तालुका डॉक्टर असोसिएशन पासुन तर गावातील लोकनियुक्त सरपंच विलास अडकमोल यांनी वारंवार या बोगस डॉक्टराचा दवाखाना तालुका आरोग्य यंत्रणेने बंद करावा अशी लिखित तक्रार केली होती.
दरम्यान आरोग्य विभागाने या संदर्भात थातुरमातुर चौकशीच्या पलीकडे काहीच केले नाही . त्यामुळे या बोगस डॉक्टराचा दवाखाना राजरोसपणे सुरूच होता , अखेर परिणामी आज या बोगस डॉक्टराकडे उपचार घेणाऱ्या एका ४० वर्षीय आदिवासी महिलेचा चुकीच्या उपचारामुळे दुदैवी मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला असुन, दरम्यान त्या बोगस डॉक्टराकडे सदरच्या महिलेचा उपचार सुरु होता पण उपचार सुरू असतांना
सदर या बोगस डॉक्टराकड्रन चुकीच्या पद्धतीने महिलेस इंजेक्शन लगावले गेल्याने तिचा पायावर विपरीत परिणाम झाले , व त्या महिलेचा मृत्यु झाल्याचे या बोगस डॉक्टराच्या लक्षात आल्याने डॉक्टराने आज दिनांक २९ऑगस्ट रोजीच सकाळीच गावातुन पळ काढले आहे . या बाबत ची अधिक माहिती घेण्यासाठी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण या संदर्भातील घटनेची त्वरित सखोल चौकशी करून या आदीवासी महिलेच्या मरणास जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरूद्ध योग्य प्रकारची कडक कारवाई करू असे सांगीतले आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा