Viral Video: मुंबई : एका ठरावीक वेळेला मुंबईतल्या लोकलला गर्दी असते. लोकलची गर्दी टाळण्यासाठी लोकं दुपारी कमी गर्दीच्यावेळी प्रवास करतात. ज्यावेळी खरचं लोकलला गर्दी असते.
त्यावेळी लोकं आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात असं अनेकदा दिसून आलं आहे. काही प्रवासी असे आहेत की, चालू ट्रेनमध्ये उतरतात आणि पकडतात. अशा पद्धतीने ट्रेन पकडत असताना एखाद्यावेळी समजा हात सुटला. तर त्या व्यक्तीला मोठी इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अनेकदा लोकांची जीव देखील गेला आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी लोकलमधून प्रवास करीत आहे. त्या व्हिडीओमध्ये स्टेशनमधून ती ट्रेन पुढे निघाली आहे. त्यावेळी त्या मुलीचा व्हिडीओ एकाने एकाने शूट केला आहे. त्या मुलीचा एक पाय ट्रेनमध्ये आहे, तर एक पाय बाहेर आहे. त्या मुलीने तिची बॅग पुढच्या बाजूला अडकवली आहे. ती मुलगी तिचा बॅलेन्स करुन उभी आहे. त्याच्या दोन्ही हातांचा फक्त एक छोटासा भाग आत आहे, बाकीचे संपूर्ण शरीर ट्रेनच्या बाहेर आहे. यादरम्यान ती अनेकवेळा विजेच्या खांबाला धडकताना वाचली आहे.
यापुर्वी सुध्दा अनेक व्हिडीओ व्हायरल
मुंबई लोकलमध्ये अशा पध्दतीने बेफिकीर पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे काही व्हिडीओ तुम्हाला मिळतील. मागच्या काही दिवसांपूर्वी एक तरुण जीवघेणा प्रवास करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो तरुण सुध्दा लोकलमध्ये दरवाज्यात लटकून प्रवास करीत होता.
तो तरुण सुध्दा वीजेच्या खांबाला धडकताना थोडक्यात बचावला होता. या व्हिडीओवरती एका व्यक्तीने लिहीले आहे की, मेट्रोसारखे सारखे ट्रेनला सुध्दा दरवाजे असायला हवेत. तसे दरवाजे आल्यानंतर अशा पद्धतीचा प्रवास कायमचा बंद होईल.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा