एरंडोल l प्रतिनिधी :- नुकतीच एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेची सभा तालुका अध्यक्ष कैलास न्याति यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुका अध्यक्ष कैलास न्याती यांचा कार्यकाळ संपल्याने सन २०२३-२०२६ साठी तालुका अध्यक्षपदी स्वामी मेडिकलचे संचालक सतीश पाटील तर तालुका सचिव पदी कासोद्याचे न्यू लक्ष्मी मेडिकलचे संचालक गुणवंत पाटील यांची सर्व कार्यकारणी सह माननीय जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याला उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. तसेच माजी अध्यक्ष कैलास न्याती यांची जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केली. सभेला तालुक्यातील सभासद हजर होते. यशस्वीतेसाठी सतीश पाटील, मनोहर पाटील, महेश पाटील, गुणवंत पाटील, नितीन शिंपी, नितीन पाटील, योगेश बियाणी, ललित पाटील. भूषण पाटील.यांचे सह सर्व सभासद बांधवांनी परिश्रम घेतले. बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष सचिव तसेच सर्व कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे. सचिव अनिल झवर यांनी अभिनंदन केले. सभा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली. आभार कैलास न्याती यांनी मानले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






