जळगाव :- वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोड्या, चोरी व अन्य गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख महिलेसह पांच जणांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे.
भावना जवाहरलाल लोढा (३८, रा. अयोध्यानगर), टोळी सदस्य अनिल रमेश चौधरी (४०, रा. अयोध्यानगर), सैय्यद सजील सैय्यद हारुन (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद अराफत सैय्यद फारुख (३४, रा.तांबापुरा) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील हद्दपार प्रस्तावाननुसार वरील पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाणे, जामनेर पोलिस ठाणे, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे, पहूर पोलिस ठाणे, चाळीसगाव शहर पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस ठाणे, चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या पाचही जणांनी सदरचे गुन्हे टोळीने केले. तसा प्रस्ताव जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी करुन त्यात माहिती निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, इम्तियाज खान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षकांकडे पाठविला. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे यांनी पाहिले. या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षकां एम. राजकुमार यांनी पाचही जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपारीचे आदेश दिले.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






