दोघेही होते घटस्फोटीत, जुळले सुत,केला प्रेमविवाह, 6 महिन्यातच करू लागला संशय, दोघात झाला वाद, केला पत्नीच्या खून.

Spread the love

पतीने नातेवाईक व एका पोलिस मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधून दिली खून केल्याची माहिती.
वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकरनगरात सुरक्षारक्षक असलेल्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, गळा चिरून निर्घृण खून केला.

नागपूर :- वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकरनगरात सुरक्षारक्षक असलेल्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी उघडकीस आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली.

प्रणाली ललित दहाट (वय ३४) असे मृत पत्नीचे नाव आहे. ललित रामदास दहाट (वय ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित दहाट हा परिसरातील शिकारा बारमध्ये सुरक्षारक्षक होता. प्रणाली आणि ललित या दोघांनीही आपल्या पहिल्या पती आणि पत्नीशी घटस्फोट घेतला आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही दिवसात ललित हा प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांची भांडणेही व्हायची. दरम्यान तो पत्नीला मारहाण करायचा. २५ ऑगस्टला प्रणाली माहेरी वर्धा येथे गेली. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ती वर्धेहून नागपुरात आली.

रहाटे कॉलनी चौकात उतरली. ललित हा तिला घ्यायला गेला. ८.३० वाजताच्या सुमारास तो घरी आला. घरी परतल्यानंतर दोघांत वाद झाला. रागाचा भारात ललितने धारदार शस्त्राने गळा चिरून प्रणालीची हत्या केली. घराला कुलूप लावून ललित पसार झाला.
पसार झाल्यानंतर ललितने नातेवाईक व एका पोलिस मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधून प्रणालीचा खून केल्याची माहिती दिली. पोलिस मित्राने वाडी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घरीजवळ पोहोचला.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, प्रणालीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी तत्काळ मृतदेह मेयोत रवाना केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करीत, पोलिसांनी ललितचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही तासातच त्याला पोलिसांनी वाडी परिसरातून अटक केली.

हे पण वाचा

टीम झुंजार