झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PMKISAN) लाभ घेणाऱ्या नोंदणीकृत लाभार्थ्यांना दि. 31 मार्च 2022 पर्यंत e-KYC करणे बंधकारक केले असल्याने ज्या लाभार्थ्यांची e-KYC दि. 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार नाही त्यांना सदर योजनेचे हप्ते बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर e-KYC शेतकऱ्यांनी स्वतः करणे बंधनकारक आहे.
त्यामुळे, तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी एरंडोल तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PMKISAN) लाभ घेणाऱ्या सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना दि. 31 मार्च 2022 पर्यंत स्वतः मोबाईल द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PMKISAN) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरून आपली e-KYC करता येईल किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्र (CSC) वर जावून e-KYC प्रती लाभार्थी प्रती बायोमेंट्रीक र 15/- चे शासनाने निर्धरीत केलेले शुल्क भरून करता येईल असे आवाहन केले आहे.
.