पारोळा l प्रतिनिधी :- पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू होते. निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. या वेळी आमदार चिमणराव पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व तोडगा काढण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ११) आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपले म्हणणे मांडावे, असे आश्वासन दिल्याने अखेर आमदार पाटील यांनी आंदोलनप्रमुख शिवा पारोचे यांना लिंबूपाणी देत ‘काम ‘बंद’ आंदोलनाला पूर्णविराम दिला.
येथील नगरपालिकेच्या तीन सफाई कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याची व तीन कर्मचाऱ्यांची एक वेतनश्रेणी कायमस्वरूपी बंद करण्याबाबतचे आदेश मागे घ्यावे, यासाठी संबंधित सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. दरम्यान, याबाबत कर्मचाऱ्यांना कुठलीही माहिती न देता हा निर्णय घेतला गेला असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी आमदारांना सांगितले.
याची दखल घेत यावेळी आमदार पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व प्रश्न मार्गी लावला. दरम्यान, शहराच्या विकासासाठी लवकरच सक्षम प्रशासक तथा मुख्याधिकारी देणार असल्याचे संकेत आमदार चिमणराव पाटील यांनी दिले.
दरम्यान यावेळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील,माजी नगरसेवक राजू कासार यांचेसह उपोषणकर्ते सफाई कर्मचारी उपस्थित होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम