डिसेंबरपर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याच्या सूचना.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रभू श्रीराम २२ जानेवारी २०१४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणार आहेत. १५ जानेवारीपासून मंदिरात अभिषेक सोहळा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राम मंदिरात प्रभू श्रीरामांचे दर्शन होणार आहे.
राम मंदिराशी संबंधित इमारत बांधकाम समितीच्या बैठकीत या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र कार्यालयात विहिंपचे अध्यक्ष आलोक कुमार, उपाध्यक्ष जीवेश्वर मिश्रा आणि राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हेही उपस्थित होते.
इमारत बांधकाम समितीची दुसरी बैठक इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यामध्ये रामसेवकपुरममध्ये उभारण्यात येणाऱ्या मूर्ती आणि मंदिराच्या तळमजल्याला अंतिम स्वरूप देण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय मंदिराशी संबंधित सर्व बांधकामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या मंदिराच्या तळमजल्यावर फरशी बनविण्याचे काम सुरू आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा