
पाचोरा :- डॉक्टर असोसिएशन ही पाचोरा शहरातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली एकजूट प्रामाणिक प्रभावशाली व सर्व डॉक्टरांच्या मदतीस धावून येणारी अशी समिती आहे.
पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे अद्भुत शांतता व निखळ आनंद देणारा प्रेरणादायी कार्यक्रम लव यू जिंदगी अर्थपूर्ण जीवनासाठी हृदय संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमानंतर पाचोरा डॉक्टर असोसिएशन बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मावळत्या कार्यकारणीतील अध्यक्ष दिनेश सोनार, चेअरमन डॉ सुनिल पाटील,उपाध्यक्ष डॉ अतुल पाटील, सेक्रेटरी नंदकिशोर पिंगळे, सहसचिव डॉ हर्षल देव, खजिनदार डॉ जिवन पाटील यांनी ही बैठक चे आयोजन केले व नवीन कार्यकारणी जाहीर केली. नवीन कार्यकारणी मध्ये डॉक्टर भरत पाटील हे चेअरमन तसेच डॉक्टर अतुल पाटील यांची अध्यक्ष म्हणून तर डॉक्टर प्रवीण माळी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
तसेच नवीन कार्यकारणीत डॉक्टर राहुल काटकर खजिनदार, डॉक्टर हर्षल देव सचिव, डॉक्टर संकेत विसपुते सहसचिव, डॉक्टर बन्सीलाल जैन व डॉक्टर राहुल झेरवाल प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तसेच सांस्कृतिक विभागाची जबाबदारी डॉक्टर वीरेंद्र पाटील व डॉक्टर योगेश इंगळे तसेच स्पोर्ट्स विभागाची जबाबदारी डॉक्टर तोसिफ पठाण व डॉक्टर सिद्धांत तेली यांच्याकडे देण्यात आली. सदर कार्यकारिणीची निवड शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध करण्यात आली
हे पण वाचा
- Viral Video: कॉलेजमध्ये वर्ग सुरू असताना तरुणी मोबाईलच्या वापर करीत होती म्हणून शिक्षिकेनं मोबाईल जप्त केल्याच्या राग आल्याने थेट चप्पलेनं केली शिक्षिकेची धुलाई.
- ५ वर्षांच्या चिमुरडीस चॉकलेट देण्याचे बहाण्याने अपहरण करून केला बलात्कार, गळा दाबून केली हत्या, महिला PSI ने केले नराधम आरोपीचा एन्काऊंटर
- गाडीला मागून धक्का मारत खाली उतरवून तलवार व कोयत्याने तीन जणांवर जीवघेणा हल्ला
- हृदयद्रावक! “माझी लेक कलेक्टर झाली” आनंदोत्सव साजरा करताना वडिलांचे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन, आनंदी घरावर दुःखाचा डोंगर
- Viral Video: नागरिकांची- वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर थेट महिलेची तरुणाला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा व्हिडिओ.