
पारोळा :- जळगाव जिल्ह्यातून लाचखोरीची आणखी एक बातमी समोर आलीय. पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आठ हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला आहे.जयवंत प्रल्हाद पाटील (वय-५४) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून या कारवाईने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
धुळे जिल्ह्यातील अंचाळे येथील तक्रारदार यांच्यासह व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलिसात गुन्हा रजि. नंबर 344/2023, भादंवि कलम 324, 323, 341, 342, 427, 504, 506, 34 प्रमाणे 12 ऑगस्ट 2023 राजी गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र लवकर न पाठविण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली.
यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपये घेतले. उर्वरित १० हजार नंतर घेवून असे सांगितले.दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी सापळा रचला. यात तक्रारदाकडून तडजोडअंती ८ हजारा रूपये स्विकारतांना पोलीस उपनिरीक्षकाल रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम