प्रतिनिधी | अमळनेर
येथून जवळच असलेल्या कळमसरे येथून रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर भरवस्तीतून अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरुन नेल्याची घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती. त्याप्रकरणी हेमंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता , मारवड पोलिसांनी शोध घेऊन गुप्त माहितीच्या आधारे कुरखेडी ता शिरपूर येथून रोटाव्हिटर सह पथकाने आरोपीस जेरबंद केले आहे.त्यास अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे
कळमसरे येथील शेतकरी हेमंत काशिनाथ चौधरी यांचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर( MH -19 BV -7129 )हे रोटाव्हेटरसह गावातील रवींद्र कोळी यांच्या घरासमोर दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी लावले होते. दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता सदर ट्रॅक्टर लावलेल्या जागी दिसून आले नाही म्हणून परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. सदर ट्रॅक्टर चोरी झाल्याची खात्री झाल्याने हेमंत चौधरी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर रोटाव्हेटरसह चोरुन नेल्याप्रकरणी मारवड पोलिसांत दिनांक १ रोजी तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी एपीआय शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सुनील तेली, सचिन निकम ,अनिल राठोड यांचे पथक नियुक्त केले असता गुप्त सुनील तेली यांना मिळालेल्या गुप्त माहितीचा आधार घेत मारवड पोलिसांनी आरोपी तुषार कोळी याने रोटाव्हीटर त्याच्या सासरवाडीत कुरखेडी ता शिरपूर येथे त्याच्या शालकाच्या शेताजवळ असल्याची माहिती मिळताच रात्री आठ वाजेच्या सुमारास थाळनेर पोलिसांना सोबत घेवून रोटाव्हीटर जप्त करून मारवड पोलिस स्टेशनला आणले होते.
तसेच १२ सप्टेंबर रोजी तुषार कोळी हा आरोपी हा शिरपूर येथे करवंद नाक्याजवळ फिरत असल्याची माहीती मारवड पोलिसांना मिळाली असता मारवड पोस्टचे हवालदार सुनिल तेली ,हवालदार सचिन निकम पोलीस , उज्वल पाटील ,अनिल राठोड यानी शिरपूर पोलिसांच्या मदतीने आरोपी तुषार शालिग्राम कोळी याला शिताफीने ताब्यात घेवून अटक केली असता १३ सप्टेंबर रोजी अमळनेर न्यायालयात हजर केले असता ,न्यायालयाने ट्रॅक्टर चोर तुषार कोळी यास दोन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली.
आरोपी तुषार कोळी यावर याआधी नरडाणा पोलिस स्टेशन मधे अनेक गुन्हे दाखल आहे. सदर आरोपीने टँकटर हे मनमाड येथील व्यापारीला विकले असल्याचे सागितले असता रात्री उशिरा टँकटर मनमाडहून मारवड पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले. आरोपी तुषार शालिग्राम कोळी हा मारवड पोलिसांच्या ताब्यात असताना ट्रैक्टर मनमाड हुन कुणी आणले याविषयी पुढील तपास मारवड़ पोलिस करित आहे
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






