प्रतिनिधी l पारोळा :- यंदा पावसाने कधी अति तर कधी दांडी मारल्याने शेतीत नापिकी सारखी अवस्था निर्माण झाली शेतीसाठी उपलब्ध केलेलं पैसा, पीक कर्ज डोक्यावर असल्याने व शेतात नापिकीची परिस्थिती असल्याने कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून चोरवड येथील २७ वर्षीय तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील वय २७ रा चोरवड ता पारोळा यांच्याकडे सुमारे पाच बिगे शेती आहे यंदा शेतीमध्ये कापसाची लागवड केलेली होती. कापसाच्या पिकासाठी त्यांनी पीक कर्जही घेतले होते परंतु यावर्षी तालुक्यात कधी जास्त तर कधी कमी व दीर्घकाळ खंड पडलेल्या पावसामुळे शेतात नापिकी सारखी परिस्थिती उद्भवली त्यामुळे पीक कर्ज कसे फेडायचे, घर संसार कसा चालवायचा या नैराश्यातून त्यांनी दि. १२ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आपल्या शेतामध्ये काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
याबाबत त्यांनी आपले चुलत भाऊ यांना ही घटना फोनवरून सांगितले यावेळी तत्काळ नातेवाईक धाव घेत त्यांना पारोळा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन वर्षाची मुलगी आहे याबाबत नितीन सुभाष पाटील यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हवालदार सुधीर चौधरी करीत आहेत
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम