यावल : येथील महाजन गल्लीमध्ये राहणारे सेवानिवृत्त नायब तहसीलदार वसंत गणपत पाटील वय८६ वर्ष हे नियमितपणे आपल्या आरोग्याची करण्यासाठी जात असे आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी यावल कडे येत असतांना त्यांचा एसटी बस मध्येच प्रवास करीत मृत्यु झाला.
या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की , यावल येथे राहणारे वसंत पाटील हे जळगाव येथे डोळयांच्या तपासणी साठी गेले असता ते परतीच्या मार्गावर जळगाव हुन यावल कडे येणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल ०९५३ या बसने आपल्या गावी यावल येत असतांना वाटेत ४,२o वाजेच्या गिरडगाव जवळ त्यांना ह्वदयविकाराच्या झकटा आल्याने ते बेशुद्ध पडले नंतर साकळी गावा जवळ बस आली असता ते मरण पावले असे एसटी कर्मचारी यांनी माहिती दिली .
त्यांना बेशुद्ध अवस्थेत तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी आणले असता , वैद्यकीय अधिकारी डॉ मयुर चौधरी यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषीत केले . अशा प्रकारे चालत्या एसटी बसमध्ये प्रवासाचा मृत्यु होण्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. याबाबत एसटी तील यावल आगाराच्या वाहक रोशनी सोनवणे यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .घटनेचे वृत्त कळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन, वाहतुक चालक दिलीप ठाकरे यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






