यावल : येथील तहसिल कार्यालयात हिंदू जनजागृती समिती कडून निवेदन देत गणेश विसर्जनसाठी कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्ती दान या अशास्त्रीय संकल्पना राबवू नये अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शाडूची माती आणि नैसर्गिक रंग यापासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी शासनाने मूर्तिकारांना देखील प्रोत्साहन आणि अनुदान द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या कडे हिंदू जनजागृती समिती कडून निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की
ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक संकटांचा सामना आज जगाला करावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.मात्र या करीता वर्षातून एकदा येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मूर्ती दान आणि कृत्रिम हौद यासारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत याद्वारे होणारी श्री गणेश मूर्तींची घोर विटंबना थांबवणे गरजेचे आहे.यापुढे गणेश भक्तांकडून मूर्तिदान प्रशासनाने व अन्य शासकीय संस्थांनी घेऊ नये तसेच प्रतिवर्षी लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव तयार करण्यात येऊ नयेत.
त्या जागी मूर्ती विसर्जनाविषयी वर्ष २०१० च्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार गणेश मूर्ती विसर्जनासाठी जलाशयामध्ये वा तळ्यामध्ये एका कोपऱ्याला लोखंडी ताऱ्यांच्या जाळीने बांधलेली दगडी भिंत तयार करून त्या ठिकाणी गणेश भक्तांना गणेश मूर्ती विसर्जन करण्यास सांगावे आणी पूर्वापार धार्मिक प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात मूर्ती विसर्जन करण्यास आठकाठी आणू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदरील निवेदन हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन भोईटे, रितेश कोळी, हेमांशू धनगर, उज्वल कानडे, धिरज भोळे, सोनू महाजन आदींच्या वतीने देण्यात आले आहे.
मुर्तीकारांना अनुदान देण्याची मागणी प्लास्टर ऑफ पॅरिस,रासायनिक रंग,कागदी लगदा आदींच्या जागी जर कोणी मुर्तीकार शाडूची माती आणि नैसर्गिक रंग यापासून गणेश मुर्ती बनवत असेल तेव्हा अशा शाडू माती पासुन बनवलेल्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी शासनाने मूर्तिकारांना प्रोत्साहन आणि अनुदान द्यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा