निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
दसनुर ( ता.रावेर) येथे पोळयाच्या पाडव्याला शुक्रवारी तसेच शनिवारी दोन दिवस उमेश्वर महादेवाचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला.
यात्रोत्सवानिमित्त सायंकाळी भगत बाळू कोळी यांनी बारागाड्या ओढल्या त्यांना बगले प्रभाकर कोळी,दिपक चौधरी, यांनी साथ दिली बारागाडया ओढण्याआधी गावातील देवीदेवतांना नैवेद्य दाखविण्यात येवून पूजा करण्यात आली.यात्रेत खादयपदार्थ, खेळणी तसेच विविध व्यावसायिकांची संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती. यंदा दोन दिवस यात्रोत्सव असल्याने यात्रोत्सवातील गर्दीही वाढली होती .निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला .
यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सरपंच भारती महाजन, उपसरपंच मयूर महाजन,महेश चौधरी,पोलिस पाटील दिपक चौधरी,तुकाराम महाजन,विशाल पाटील, शामा कोळी, आनंदा महाजन,अशोक पाटील, त्रंबक चौधरी, हेमंत चांदवे, भागवत महाजन, राहूल महाजन, होमगार्ड विजय चौधरी ग्रा.पं सदस्य यांचेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






