जळगाव : रात्रीचे जेवण आई-वडील आणि बहिणींसोबत केले. यानंतर गप्पा केल्या व घराच्या वरच्या खोलीत झोपायला गेला. परंतु खोलीत गेल्यानंतर गळफास घेत त्याने जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. कुसुंबा (ता. जळगाव) येथील तेजस धोंडू पाटील असे या तरूणाचे नाव आहे.
तेजस रात्री रूममध्ये झोपायला गेला परंतु दिवस उजाडूनही मुलगा खाली येत कसा नाही, म्हणुन वडील उठवायला गेले असता त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यावेळी कुटूंबासह शेजाऱ्यांनी धाव घेतली.
याबाबत एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
वडिलांना कामात करायचा मदत
तेजसच्या वडिलांचे गॅरेज आहे. दरम्यान तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. घरातील करता मुलगा गेल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






