प्रतिनिधी l पारोळा
जनावरांमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्या असल्याकारणाने जिल्हाभरातील अनेक तालुक्यातील बैल बाजार हे बंद करण्यात आले आहेत. परंतु पारोळ्यात आज आठवडे बाजारानिमित्त खुल्या जागेत यांचा बाजार हा भरला असल्याचे दिसून आले आहे परिणामी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.
लम्पी आजाराने गुरे हे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत शासनावतीने लसीकरणाचे काम देखील घेण्यात येत आहे हा संसर्ग वाढू नये म्हणून पोळा या सणावर देखील निर्बंध लावण्याचे प्रयत्न किंवा सूचना दिल्या गेल्या होत्या अशा तसेच जिल्हाभरात भरणारे बैलांचे बाजार हे बंद करण्यात आलेले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवडे बाजार निमित्त बैलांचा बाजार हा भरण्यात येतो. परंतु आज बाजार समिती आवारात बैलांचा बाजार न भरता तो अमळनेर रस्त्यावरील महेश माळ समोरील खुल्या जागेमध्ये बैलांचा बाजार हा भरल्या असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी असताना देखील मार्केट कमिटी पासून हाकेच्या अंतरावर बैलांचा बाजार भरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला त्यातून केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे परिणामी डॉक्टर उल्हास देवरे संदर्भात दखल घेऊन पुढील आठवड्याला हा बाजार भरणार नाही गावातील उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे तसेच देताना देखील या संदर्भात ज्या विचारायची आवश्यकता निर्माण झाली आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम