धक्कादायक- जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

जळगाव :- महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे. अशात जळगाव शहरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला.  इतकंच नव्हे तर मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातील मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेली असता त्यावेळीस दीपक सोनवणे (पुर्ण नाव गाव माहित नाही) या मुलाशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्या मुलीला काही ना काही कारण सांगून शहरातील फुले मार्केटमध्ये बोलावून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान ही घटना घरी कोणालाही सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना मारून टाकेल अशी तरूणाने दिली. या संदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक सोनवणे (पूर्ण नाव गाव माहीत नाही) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे

.

टीम झुंजार