पहिली पत्नी असून देखील केलं दुसर लग्न तिच्याशी न पटल्याने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीला संपवले, मृतदेह फेकला कालव्यात.

Spread the love

परभणी : एकीशी लग्न झालेले असताना देखील दोन वर्षात दुसरीशी लग्न केले. मात्र, तिच्याशी न पटल्याने वाद टोकाला गेला. अखेर या वादाला कंटाळल्याने पतीने पहिल्या बायकोच्या मदतीने दुसऱ्या बायकोचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
यानंतर दोघांनी मिळून मृतदेह कालव्यात फेकला. ही घटना उघड झाल्याच्या १२ तासांत पोलिसांनी आरोपी नवरा बायकोला अटक केली आहे. माहितीनुसार परभणी शहरातील नांदखेडा रोड परिसरात ही घटना रविवारी घडली.

शिल्पा नामदेव दुधाटे (रा. नेहरुनगर, परभणी) असे हत्या करण्यात आलेल्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. तर नामदेव दुधाटे आणि स्वाती दुधाटे असे आरोपी पती-पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी शहरातील नांदखेडा रोड परिसरातील एका कालव्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, उत्तरीय तपासणीत महिलेचा खून करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचे उघड झाले.

या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, ही महिला कोण, कुठली याचा तपास पोलिसांनी सुरू केला. ही महिला परभणी शहरातील नेहरुनगर परिसरात राहण्यास असून तिचे नाव हे शिल्पा नामदेव दुधाटे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तपसाची चक्रे वेगाने फिरवली. या महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. लिमला येथील नामदेव दुधाटे हा तिचा पती असल्याचे तपसात उघड झाले. पोलिसांनी नामदेव दुधाटेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो त्याच्या मुळ गावी लिमला येथे गेल्याचे पोलिसांना कळले.

पोलिसांनी पथक पाठवत लिमला येथील त्याच्या घरी गेले. यावेळी नामदेव हा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत सापडला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. तसेच त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी शिल्पा हीचा खून केल्याची कबुली दिली.शिल्पा आणि नामदेव हे दोघे लग्नानंतर परभणी येथील नेहरुनगर येथे राहत होते. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास त्यांचे घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्यातून आरोपी नामदेव दुधाटे आणि त्यांची पहिली पत्नी स्वाती दुधाटे यांनी शिल्पाला मारहाण करून हत्या तिचा मृतदेह हा कालव्यात फेकून दिला.

हे पण वाचा

टीम झुंजार