CCTV Video:उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका जिममध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक २१ वर्षीय तरुणाचा ट्रेडमिलवर धावताना अचानक मृत्यू झाला आहे. संबंधित तरुणाला ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मृत तरुणाचं नाव सिद्धार्थ असून तो खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती विहार येथील रहिवासी आहे. तो आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा असून तो नोएडा येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होता.
व्हायरल व्हिडीओत संबंधित तरुण ट्रेडमिलवर धावताना दिसत आहे. ट्रेडमिलवर धावत असताना अस्वस्थ वाटल्याने तो अचानक थांबला आणि क्षणार्धात खाली कोसळला.
यावेळी जिममध्ये व्यायाम करणाऱ्या इतर दोन तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी सिद्धार्थला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जिममधील या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






