जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस आगळा – वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
वृषभ :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल. अचानक धनलाभाची पण आज शक्यता आहे.
मिथुन :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश – कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. तरी सुद्धा आपण वाणी व क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. आपले मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. त्याच बरोबर मान – सन्मान सुद्धा प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील.
कर्क :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. अपचन, अजीर्ण असे विकार त्रास देतील. आज बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहणे उचित ठरेल.
सिंह :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज कुटुंबातील वातावरण वाद – विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. आजचा दिवस जमीन, घर, वाहन इत्यादी व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास अनुकूल नाही. नोकरदारांना पण दिवस अनुकूल नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा.
कन्या :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल. आपले नुकसान टाळण्यासाठी कोणतेही काम विचार पूर्वकच करावे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
तूळ :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृश्चिक :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. स्नेही व मित्रवर्ग यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आनंददायी प्रवास घडेल. दांपत्य जीवनात गोडी अनुभवाल. सामान्यतः संपूर्ण दिवस खुशीत जाईल.
धनू :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. एखादी दुर्घटना संभवते. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. न्यायालयाशी संबंधित कामकाजात जपून पावले उचलावीत.
मकर :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर – सट्टा ह्यात धन लाभ होईल. मित्र व संबंधित ह्यांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. सामाजिक क्षेत्रात, नोकरी – व्यवसायात लाभ होईल.
कुंभ :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी – व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. मान – सन्मान होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल.
मीन :-
आज दिवशी चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील. सरकार कडून एखादा त्रास संभवतो. संततीशी मतभेद होतील.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






