झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- कोरोना काळात विविध सेवेत काम करणाऱ्या महिला चा मोठे योगदान असल्याचे महिला दिनानिमित्त सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना अमोल चिमणराव पाटील म्हणाले यावेळी तालुक्यातील 300 कोरणा योद्धा महिलांचा यावेळी साडी प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ८ मार्च महिला दिनाच्या औचित्याने एरंडोल पंचायत समिती सभापती शांताबाई सखाराम महाजन व पंचायत समिती, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२० ते २०२२ या कोरोना काळात फ्रंटलाईन मध्ये काम करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलतांना जिल्हा बँक संचालक म्हणाले स्वतःच्या कुटुंबा सोबत समाजाची काळजी घेऊन धाडसी पणाने कोरोना आजाराशी लढले, उत्तम सेवा दिली कोरोना काळात तालुक्यातील महिला अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा भगिनिंच्या महिला मोठे योगदान आहे तसेच विद्यमान सभापती शांताबाई महाजन व माजी सभापती दिलीप रोकडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी खासकरून कौतुक केले .अमोल पाटील यांच्या व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते 300 कोरोना योद्धा महिला भगिनींचा सत्कार व सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांनी खास महिला भगिनींचे करून कौतुक केले व यांच्या मानधनाबाबत सर्वांनी विचार केले पाहिजे यांच्या पाठीशी उभे रहायला पाहिजे असे ते म्हणाले तर माजी सभापती दिलीप रोकडे यांनी आपल्या मनोगतात आजचा हा कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. फीरोज शेख यांच्या संकल्पनेतून होत असल्याचे बोलले तसेच भविष्यातही आपण महिला भगिनी साठी योग्य ते प्रयत्न करू तसेच दरवर्षी महिला दिनानिमित्त अशाच मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांचा सत्कार करण्याचा प्रयत्न आम्ही करू. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांनी एकमेकींमध्ये चढाओढ करण्यापेक्षा सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम केले पाहिजे. असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वडगावकर तर प्रस्ताविक गटविकास अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यानी केले. तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशाभगिनी , सामान्य व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका अशा एकूण 300 महिलांना कोरोना योध्दा प्रशस्ती प्रमाणपत्र व साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आला,
समन्वय समिती अध्यक्ष रमेश महाजन तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.माजीउपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, हिम्मत पाटील, हेमलता रोकडे, शिरपुर नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, वैशालीत देवरे, ज्योती ज्ञानेश्वर पाटील, गिता रोकडे, मा.जि.प.सदस्या जयश्री महाजन, नगरसेविका आरती महाजन, नगरसेवक कुणाल महाजन, सुदाम द्राक्षे, मा.सभापती मोहन सोनवणे, मा.नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तळई येथील रतन पाटील, अंतुर्ली येथील दंगल पाटील, आनंदा धनगर, हारून देशमुख संजय गांधी समिती सदस्य आनंदा चौधरी(भगत), गटविकासअधिकारी भाऊसाहेब अकलाडे,शहर प्रमुख कृनाल महाजन गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,महिला बाल कल्याण अधिकारी शैलजा पाटील, युवा सेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, पत्रकार संजय चौधरी, जावेद मुजावर, बाबुलाल चौधरी, राजेंद्र पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॕ. फिरोज शेख शेख, अमोल भावसार, पं.स.सदस्या शांताबाई लहू मालचे, निलिमा महाजन, गोविंदा राठोड, ओंकार महाजन, मिराताई महाजन, यांसह पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व आदी मान्यवर उपस्थित होते.