अमळगाव ता अमळनेर l प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या जळोद ग्रामपंचायत सरपंचपदी सौ कल्पना ज्ञानेश्वर चौधरी यांची बिनवरोध निवड करण्यात आली
येथील २०२१ साली झालेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक बिनविरोध करून जळोद गावाने एक आदर्श पायंडा पाडला ठरल्याप्रमाणे सौ भारती शशिकांत साळुंखे यांना अडीच वर्षाचा कार्य काळासाठी सरपंचदासाठी संधी देण्यात आली नुकताच त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा गट विकास अधिकारी यांना सुपूर्द केला
आणि रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला यात ठरल्याप्रमाणे सौ कल्पना ज्ञानेश्वर चौधरी यांची सरपंचपदी निवड करण्यात आली त्या आदर्श शेतकरी ज्ञानेश्वर पांडुरंग चौधरी यांच्या धर्मपत्नी आहेत
यावेळी उपसरपंच दीपक पारधी ग्रा व सदस्य सौ भारती साळुंखे विलास देशमुख बेबीबाई चौधरी भारती कोळी कल्पना भोई मयुरी बाविस्कर वंजाबाई भिल गावातील नागरिक मा जि प सदस्य व्ही आर पाटील ज्ञानेश्वर चौधरी शशिकांत साळुंखे विलास पाटील हरेश कोळी नाना भोई अनिल पाटील एमडी चौधरी
डॉ जितेंद्र चौधरी रघुनाथ चौधरी सुरेश चौधरी भारती पाटील बापूराव कोळी जवाहरलाल भोई नागो कोळी विठ्ठल चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव कटारे यांनी कामकाज केले त्यांना तलाठी जितेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले निवडीबद्दल मा आ शिरिषदादा चौधरी यांनी अभिनदन केले तसेच जळगाव जिल्हा तेली समाज व झुंजार न्यूजचे संपादक,माजी उपनगराध्यक्ष संजय चौधरी यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






