जातीचे दाखले मिळण्यासाठी 240 शालेय विद्यार्थी पालकासह एरंडोल प्रांताधिकारी कार्यालयावर धडकले.

Spread the love

शालेय विद्यार्थ्यांनी भर उन्हात मोर्चा काढून केले उपोषण. प्रांताधिकारी यांनी मागणी केली मान्य, उपोषण सोडले.पहा व्हिडिओ

प्रतिनिधी | एरंडोल

शालेय विद्यार्थ्यांना शाळेत सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आदिवासी कोळी जमातीतील जातीचे दाखले मिळत नाही. त्यामुळे विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या २४० विद्याथ्र्यांनी पालकांसह कार्यालयावर मोर्चा आपल्या प्रांताधिकारी काढून आंदोलन केले. तसेच कोळी महासंघ महाराष्ट्र राज्यातर्फे एरंडोल तालुका अध्यक्ष भिकन रमेश कोळी व पंचायत समिती माजी सदस्य शारदा भागवत पाटील यांचे पती भागवत भिकन पाटील यांनी उपोषण केले.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास उत्राण येथील २४० विद्यार्थी व विद्यार्थिनी आपल्या पालकांसह पंचायत समिती येथे एकत्र येत प्रांताधिकारी कार्यालयावर दुपारी भर उन्हात धडक मोर्चा काढला. उत्राण येथील टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी असलेल्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे हे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहेत. आम्ही विद्यार्थी व पालक सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी जातो. मात्र सुविधा केंद्रावर अर्ज दाखल केला जात नाही.

तहसील व प्रांताधिकारी कार्यालयाने कोळी समाजाचे जातीचे प्रकरण सबमिट करू नये अशा सुचना असल्याचे उत्तर सेतू सुविधा केंद्र चालकांकडून दिले जाते.तहसील कार्यालय व प्रांत अधिकारी यांनी सेतू सुविधा केंद्रांना आदेश करून ज्या नागरिकांकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र असेल किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्यायचे आहे. अशा विद्यार्थ्याचे व पालकांचे जातीच्या प्रमाणपत्राची चौकशी करून प्रांत अधिकारी यांनी द्यावे अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली.

तहसीलदारांची शिष्टाई असफल……
दुपारी बारा वाजता आंदोलनास प्रांत कार्यालयासमोर सुरुवात झाली. परंतु प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड हे शासकीय कामानिमित्त चोपडा येथे गेल्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. दरम्यान दुपारी एक वाजेच्या सुमारास तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी आंदोलन करीत असलेले विद्यार्थी व पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलनकर्त्यांनी ऐकले नाही. जोपर्यंत प्रांताधिकारी समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी घेतली.

विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी…..

आंदोलन स्थळी माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील हे सुद्धा बसून होते. त्यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यात यावी. अशी मागणी केली. माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील, प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या हस्ते सरबत देऊन भिकन कोळी व भागवत पाटील यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.

यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, अँड गणेश सोनवणे, माझी जि प सदस्य भिका कोळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल साबळे, सुरेश नन्नवरे, संभाजी शिवरे तालुकाध्यक्ष भीषण भिकन कोळी यांनी मार्गदर्शन केले.

पुरावे असणाऱ्यांना तत्काळ मिळणार दाखले ……. दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड आले. त्यांनी आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ज्या विद्यार्थ्यांना व पालकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल अशा विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावे. त्यासोबत पुरावे सोबत जोडावे अशा विद्यार्थ्यांना तात्काळ जातीचे दाखले दिले जातील.

पहा व्हिडिओ

टीम झुंजार